आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृत योजनेतील वाढीव कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथील सीपीडीएम कार्यालयास १८५ कोटी ८४ लाख रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. सुप्रमाऐवजी या वाढीव कामांचा अमृत टप्पा-२मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्यासाठी १६५ कोटी खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाने तयार केला आहे. तो लवकरच शासनाला देण्यात येईल. दरम्यान, वारंवार होणारे बदल, लालफितीचा कारभार, राजकीय अनास्थेमुळे शहरातील अमृत योजनेला दिरंगाईची विषबाधा झाली आहे. अटल मिशन फार रेेेज्युवेनशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच अमृत योजनेचा जल स्त्रोत यापूर्वी शहरातील यावल रोडवरील तापी पुलाजवळ होता. हा जलस्त्रोत
वारंवार बदल, टाकलेले पाइप पुन्हा काढले
अमृत योजनेचा मूळ जल स्त्रोत (उद्भव) हतनूर धरण होते. यानंतर ते बदलून यावल रोडवरील तापी पुलाजवळ झाले. यासाठी पुलाजवळ बंधारा बांधण्याचे ठरले. मात्र, हा भाग शेळगाव बॅरेजच्या बॅक वॉटरमध्ये येत असल्याने हा प्रस्ताव रद्द झाला. यानंतर शेळगाव बॅरेजच्या मृत साठ्यात जॅकवेल उभारणी ठरले. गेल्या पाच वर्षांत असे अनेक बदल झाले. पूर्वीच्या उद््भवासाठी यावल रोडवर टाकलेली पाइपलाइन पुन्हा काढावा लागली.
या कामांचा टप्पा-२मध्ये समावेश
अमृत योजनेच्या वाढीव कामांमध्ये शेळगाव बॅरेजच्या मृत साठ्यात जॅकवेल उभारणी, जॅकवेलपासूहत्ती गेले शेपूट राहिले अमृत योजनेस २२ मे २०१७ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, हे कामे पाच वर्षे होऊनही अपूर्ण आहे. योजनेच्या टप्पा-१ मधून ९० कोटी ८४ लाखांच्या निधीतून २१४ किमीची पाइपलाइन, ४५ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र, ११ जलकुंभ उभारणी होणार होती. या कामांसाठी तीनवेळा मुदतवाढ दिली गेली. शेवटची मुदत जुलै २०२२ मध्ये संपली. तरीही पाइपलाइन १५ टक्के, तर जलकुंभांची २५ टक्के कामे अपूर्ण असल्याची वस्तुस्थिती आहे. न १० किमी अंतरावर महामार्गावरील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ८०० मीमी व्यासाच्या १० किमी अंतराच्या मेन रायझिंग पाइपलाइन, शहरातील सुमारे ११० किमीची वाढीव पाइपलाइन, ११ पैकी पंचशील नगरातील रखडलेला जलकुंभ आदी कामांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.