आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:रावेर पालिकेच्या कर आकारणीवर 1,883  हरकती; 11  नोव्हेंबरची मुदत

रावेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हद्दवाढ झाल्यानंतर रावेर पालिकेने रावेर ग्रामीण भागातील २७ कॉलन्यांमधील रहिवासी घर मालकांना अव्वाच्या सव्वा कर आकारणीवर करुन नोटीस बजावल्या आहेत. या कर आकारणीवर हरकती घेण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दरम्यान आतापर्यंत तब्बल १८८३ जणांनी हरकती घेतली आहे.रावेर नगरपालिकेचे सुमारे १२ हजार खातेदार आहेत. यापैकी सुमारे १० हजार मालमत्ता धारकांना कर आकारणीची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना काळात कोणतेही कर लादण्यात येऊ नये, असे शासनाचे धोरण होते.

तरीही रावेर पालिकेने मागील तीन वर्षांची ६० टक्के कर आकारणी बजावली आहे. सन १८९२ पासून रावेर पालिकेच्या हद्दवाढीची मागणी होती. त्यास यश येऊन रावेर ग्रामीण भाग रावेर पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला. दरम्यान, प्रत्येक वर्षाला २० टक्के कर आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या काळात घरांचे सर्वेक्षण करता आले नाही. नंतर २०२१ मध्ये एका कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून कर आकारणी करण्यात आली. सन २०२२ मध्ये एकाच वेळेस तीन वर्षांची ६० टक्के केलेली आकारणी अमान्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी १८८३ हरकती देखील घेतल्या आहेत.

कर आकारणी योग्यच, टाऊन प्लॅनिंग घेणार निर्णय
नगरपालिकेने नियमानुसार ६० टक्के केलेली कर आकारणी योग्य आहे. ज्यांना चुकीचे वाटते त्यांनी हरकती घ्याव्या. इतर कामांचा जास्तीचा ताण असल्याने आलेल्या हरकतींकडे लक्ष दिले जात नाही. सदर हरकतींबाबत टाऊन प्लॅनिंग यंत्रणेकडून योग्य निर्णय घेतला जाईल.- प्रमोद चौधरी, कर निरीक्षक, रावेर पालिका

बातम्या आणखी आहेत...