आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बहि:स्थ शिक्षण विभागात‎ 19 प्रमाणपत्र अभ्यासक्रम‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ‎ शिक्षण आणि अध्ययन विभागातर्फे‎ नवीन १९ प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू‎ होत असून, त्यासाठी ऑनलाइन‎ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.‎ कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी‎ यांच्या पुढाकाराने रोजगाराभिमुख‎ शिक्षणक्रम सुरू करण्यात आले‎ आहेत. १५ मार्चपासून नवीन १९‎ शिक्षणक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश‎ प्रक्रिया सुरू केली जात आहे. हे सर्व‎ शिक्षणक्रम ऑनलाइन पद्धतीने‎ होणार आहेत. त्या-त्या विषयातील‎ तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांकडून‎ मार्गदर्शन प्राप्त होईल.

शनिवार व‎ रविवार प्रत्येकी दोन तास या‎ शिक्षणक्रमांचे ऑनलाइन वर्ग होणार‎ आहेत. संस्कृत, उर्दू, इंग्रजी‎ संभाषण कौशल्य, जर्मन भाषा,‎ जपानी भाषा, फ्रेंच भाषा, स्पॅनिश‎ भाषा, जर्मन भाषा A1, जर्मन भाषा‎ A2 स्तर, मोडीलिपी या‎ शिक्षणक्रमांसोबत लिंग‎ संवेदनशीलता, सायबर गुन्हे व‎ कायदे, बौद्धिक संपत्ती हक्क,‎ मानसशास्त्रीय कसोट्या व‎ मोजमाप, संशोधन पध्दतीची‎ मूलतत्त्वे, संशोधनासाठी संबंधित‎ साहित्य व ग्रंथसूची लेखन,‎ संशोधन प्रस्ताव लेखन,‎ एसपीएसएसद्वारे संशोधन माहिती‎ विश्लेषण, संशोधन अहवाल व‎ पेपर लेखन हे अभ्यासक्रम आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...