आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:परसाडे सरपंचपदासाठी 2, मालोदला आठ महिला निवडणुकीच्या रिंगणात

यावल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सरपंच पदासाठीच्या सात तर सदस्य पदासाठीच्या १४ अशा एकूण २१ उमेदवारांनी माघार घेतली. तर माघारीनंतर परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दोन जण रिंगणात आहेत. मालोद ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी तब्बल आठ महिला रिंगणात आहेत. दोन्ही ग्रामपंचायतींच्या एकूण २२ सदस्य पदांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

मालोद ग्रा.पं.सरपंच पदासाठीच्या एका उमेदवाराने माघार घेतली. आता या ग्रुप ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी आठ महिला रिंगणात आहे. तर पाच प्रभागातील १३ जागांसाठी दाेन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २८ उमेदवार रिंगणात आहेत. परसाडे बुद्रुक मंगळवारी ६ जणांनी माघार घेतल्याने येथे दोघात सरळ लढत आहे. तर तीन प्रभागातील नऊ जागांसाठी १९ जण रिंगणात आहे.

परसाडेत महिलांना संधी, लढत लक्षवेधी
परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीकरिता राखीव होते. मात्र गावात दोन्ही गटांकडून महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात भाजपच्या मीना राजू तडवी विरुद्ध काँग्रेसच्या नजमा मजित तडवी यांच्यात लक्षवेधी लढत आहे. नजमा तडवी माजी सरपंच असून मीना तडवी या माजी पंचायत समिती सदस्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...