आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:24 तासांत 2 मिमी पाऊस,  कमाल तापमान 34 अंश

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी 2 मिमी पाऊस झाला. या पावसाने हवेतील धूलिकणांचे प्रमाण घटले आहे. हवेची गुणवत्ता (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) प्रथमच ३९च्या पातळीवर आला. दुसरीकडे कमाल ३४.१ व किमान तापमान २२.३ अंश होते.

गेल्या रविवारपासून जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरणात थंडी गायब झाली असून, किमान तापमान सातत्याने २२ अंशांवर स्थिरावले आहे. परिणामी वातावरणात उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने जळगाव शहरात एअर क्वाॅलिटी इंडेक्स १६४च्या उच्चांकावर गेला हाेता; परंतु सलग तिसऱ्या दिवशी काेठे ना काेठे पाऊस हजेरी लावत आहे. या काळात भुसावळ शहरातही तुरळक पाऊस झाला. पावसामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण घटले आहे. हवेप्रमाणे मातीतही आर्द्रता वाढली.

बातम्या आणखी आहेत...