आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यावलमधून 20 टन केळी थेट इराणला रवाना; मेहनतीचे फळ, खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, फवारणीची घेतली काळजी

यावल20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे त्यांची बुधवारी कापणी झालेली २० टन केळी थेट इराण येथे निर्यात केली जात आहे. ही जी-नाईन व्हरायटीची केळी असून निर्यातीमुळे बाजारभाव पेक्षा क्विंटल मागे ५०० रूपये जास्तीचा भाव मिळाला आहे.

केळीवर वारंवार वेगवेगळी संकटे, आपत्ती कोसळते. तरीही खचून न जाता अनेक शेतकरी उच्च दर्जाची केळी पिकवतात. या केळीला विदेशातून मागणी होते. भाव देखील चांगला मिळतो. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारीक पद्धतीने बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार शहरातील शेतकरी किशोर देवराम राणे यांनी कोल्हापूर येथील अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जी-नाईन व्हरायटी-च्या टिशू रोपांची आपल्या शेतात पाच बाय बाच फुटाचा मोठा गाला तयार करून त्यात टिशू रोपांची लागवड केली.

वेळोवेळी खते, फवारणी व पाण्याचे योग्य नियोजन केले. यानंतर तयार झालेली निर्यातक्षम आहे किंवा नाही? याची तपासणी करून घेतली. यानंतर बुधवारपासून तंत्रशुद्ध पद्धतीने २० टन केळी कापणी झाली. निर्यातीच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया करत ही केळी थेट इराणमध्ये रवाना होणार आहे. दरम्यान या केळीला बाजारभावापेक्षा क्विंटल मागे ५०० रूपये जास्तीचा भाव मिळाल्याने केळी उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अशी करा कापणी
केळी कापणी करताना खोड कापले जात नाही. परिणामी केळीच्या उभ्या झाडाला ज्या मात्रेत खतपुरवठा, मिनरल्स दिलेले असतात ते खोडा जवळील पिलाला मिळतात. पिलबागेचे उत्पादन चांगले येते. उभ्या असलेल्या खोडामुळे जमिनीची धूप कमी होते. ओलावा टिकून राहतो आणि शिल्लक खोडापासून चांगले उत्पादन येते.

५०० रूपये जास्त भाव
सध्या केळीला एक हजार रुपये क्विंटल असा बोर्ड भाव आहे. राणे यांच्या केळीला क्विंटल मागे ५०० रूपये जास्त म्हणजेच दीड हजार रूपये भाव मिळाला. पारंपरिक पद्धतीच्या पलिकडे जावून लागवडी पासून ते उत्पादन येईपर्यंत योग्य निगा ठेवल्यास निर्यातक्षम केळी उत्पादन घेता येते, असे शेतकरी किशोर राणे यांनी सांगितले. यावल तालुक्यातील न्हावी, सातोद, पिळोदा, साकळी अशा ग्रामिण भागातील केळी देखील परदेशात जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. चांगल्या भावामुळे मागील नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...