आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:यावलची २१ मंडळे आज देणार गणरायाला निरोप; उत्सव मिरवणुकीत अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावल शहर व तालुक्यातील पाच गावांमध्ये रविवारी पाचव्या दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून यावल पोलिसांनी यावल शहरातील विसर्जन मार्गाची पाहणी केली. त्यात बेहेडे सुपर शॉपजवळील अडथळा दूर केला. तेथील अतिक्रमण काढले. शिवाय रविवारी शहरात बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील २१ मंडळे निरोप देणार आहे.

त्याचप्रमाणे नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव व सावखेडासीम येथे देखील पाचव्या दिवसाच्या बाप्पाला १५ मंडळांकडून निरोप देण्यात येईल. दुपारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू होणार आहेत. यावल शहरात मेन रोडवर बेहेडे सुपर शॉपजवळ मिरवणुकीला अडथळा ठरणारे विविध प्रकारचे अतिक्रमण होते. टेलिफोनचे खांब, काही दुकानांच्या पायऱ्या अडथळा ठरणाऱ्या होत्या. हे अतिक्रमण काढण्याचे काम शनिवारी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या उपस्थित पालिकेमार्फत करण्यात आले. रविवारी दुपारी ३ वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

असे होणार विसर्जन.. रविवारी (दि.४) पाचव्या दिवशी यावल शहरातील २१ सार्वजनिक मंडळे, नायगाव १, कोरपावली ४, डांभुर्णी ६, दहिगाव ३ आणि सावखेडा सिम येथील १ अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...