आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरप्राइज व्हिजिट:55 कोटींच्या निधीतून 22 रस्त्यांच्या कामांना सुरुवात

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यात ५५ कोटी रुपये निधीतून २२ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. ही कामे गुणवत्तापूर्वक व्हावी यासाठी आमदार संजय सावकारे प्रत्येक ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी करत आहेत.भुसावळ तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी आमदार सावकारे यांनी पुरवणी अर्थसंकल्पीय लेखाशिर्षातून निधी मागितला होता.

त्यानुसार २२ रस्त्यांसाठी शासनाने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून कंत्राटदारांना वर्कऑर्डर दिल्या. यापैकी वराडसिम ते गोजोरे, वराडसिम ते कुऱ्हा, सुनसगाव ते बेलव्हाय, खंडाळे ते वेल्हाळे, महामार्ग ते खडका गाव, खडका ते किन्ही या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली. उर्वरित कामे आठवडाभरात सुरु होतील. त्यात रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण व गावातून जाणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल. या कामांची आमदार सावकारे स्वत: अचानक पाहणी करून आढावा घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...