आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा पालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट नसलेल्या शहरातील भुसावळ ग्रामीण भाग, प्रांताधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतो. या भागासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. तब्बल १९ कोटी ५७ लाख ५८ हजारांच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या या योजनेतून भुसावळ ग्रामीणमधील, २२ हजार लोकसंख्येची तहान भागेल. या योजनेसाठी तापी नदीच्या पिंप्रीसेकम येथील पात्रातून पाणीउचल केली जाणार आहे. तब्बल ३५ हजार ४१४ मीटर अंतराची पाइपलाइन, सात लाख लिटर क्षमतेचे तीन जलकुंभ या योजनेवर असतील.
डिझाइनचे काम सुरु
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने आता ३ लाख लिटरचे दोन तर १ लाख लिटरचा एक असे तीन जलकुंभ उभारणीसाठी विविध भागांतील सॉईल टेस्टसाठी नमुने घेतले आहे. तसेच जलकुंभांची उभारणीसाठी डिझाईन तयार केले जात आहे. सॉईल टेस्टच्या अहवालानंतर जलकुंभ उभारणीसाठी जागा निश्चित होईल. या भागासाठी सात हजार लिटरचे तीन जलकुंभ असतील.
पाइपांची मागणी नोंदवली
पिंप्रीसेकम येथील तापी पात्रात जॅकवेल उभारुन जलस्त्रोत उपलब्ध केला जाणार आहे. जॅकवेल पासून जलशुद्धीकरण केंद्र व तेथून जलकुंभापर्यंत एकूण ३५ हजार ४१४ मीटर एचडीपीई पाइप वापरला जाणार आहे. मजीप्राने शासनाकडे पाइपांची मागणी नोंदवली आहे. एस. पी. लोखंडे, उपविभागीय अभियंता, मजीप्रा, भुसावळ
अमृत योजनेपूर्वी होणार पाणीपुरवठा
भुसावळ ग्रामीणसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा नाही. हा भाग शहरात असला तरी पालिका हद्दीत येत नसल्याने अमृत योजनेत समावेश करता येत नाही. यामुळे या भागातील किमान २२ ते २५ हजार लोकसंख्येसाठी स्वतंत्र यंत्रणा मंजूर केली. शहरातील अमृत योजनेपुर्वी ही योजना सुरु होईल. - संजय सावकारे, आमदार
या भागासाठी योजना
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरुन महामार्गावरील माळी समाज हॉल परिसर, यामागील पुजा कॉम्पेलक्सव परिसरातील वस्त्या, पांडुरंगनाथनगर, ;शिवपूर कन्हाळे रोडवरील आरएमएस कॉलनी व परिसर, गुलमोहर प्रेस्टीज फेज चारचा भाग, शिवपूर कन्हाळे रोडवरील घोडेपीर बाबा दर्गा परिसरातील वाढीव वस्त्यांना योजनेला लाभ मिळेल.
अशी असेल योजना
३.५ टीएमएलसी क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र१२ मीटर उंचीचे सात लाख लिटर क्षमतेचे तीन जलकुंभ७५, ९०, ११०, १४० व १६० मीटर व्यासाची एचडीपीई पाइपलाइनरुळ क्रॉसिंगसाठी६० ० मिमी एचडीपीई पाइपचा वापरतापीपात्रात जॅकवेलसह १२० मीटर लांबीचा अप्रोच ब्रीज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.