आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरी भागात एकत्र कुटुंब व्यवस्था कधीच मोडीत निघाली नाही. प्रायव्हसीच्या बहाण्याने नोकरी व्यवसायासाठी शहरात स्थिरावलेले अनेक जण तर आई-वडिलांदेखील जवळ ठेवत नाही. मात्र, शहरातील जंगले कुटुंब या सर्वांना अपवाद आहे. या कुटुंबात तीन पिढ्यांचे प्रतिनिधी असलेले २३ सदस्य अजूनही एकत्र नांदतात. संपूर्ण परिवाराचे एकच किचन आहे. सकाळी प्रत्येक जण त्याच्या नियोजनानुसार जेवण करत असला तरी सायंकाळी मात्र सर्वांनी सोबत जेवण घ्यायचे असा या कुटुंबाचा शिरस्ता आहे.
गोविंदा ओंकार जंगले यांनी सन १९६५ मध्ये भुसावळ शहरात रासायनिक खते व इलेक्ट्रिक पंप विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर ते सतरंजी विक्रीच्या व्यवसायाकडे वळली. त्यांची सुधारक, उत्तर, चंद्रकांत व वसंत जंगले ही मुले एकत्र राहात होती. नंतर या चारही जणांना अपत्ये झाली. जगदीश, श्रीपाद, देवेंद्र, संजय व सूर्यकांत (रवी) अशी त्यांची नावे आहे. कालांतराने यांना देखी मुले व मुली झाल्या. अशा संपूर्ण जंगले परिवारात आता ९ पुरूष आणि १४ महिला मिळून एकूण २३ सदस्य आहेत. मात्र, आजोबा, वडिलांनी दिलेल्या शिकवणी-नुसार आजही सर्व जण गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात राहतात. एवढा मोठा परिवार असूनही वादविवाद नाही. रुसवेफुगवे नाहीत. काहीही निर्णय घ्यायचा असल्यास सर्व भाऊ एकत्र बसतो. चर्चेअंती निर्णय होतो,असे जगदीश जंगले यांनी सांगितले. जंगले परिवारातील सर्व जण उच्चशिक्षित आहेत. १९६५ पासून कृषी केंद्र असल्याने बहुतेकांनी कृषी विभागाशी निगडीत शिक्षण घेतले आहे. कोरोना काळात एकमेकांची विशेष काळजी घेतली असे श्रीपाद जंगले यांनी सांगितले.
सहा मुले शिक्षणासाठी बाहेर : पाचही भावांची मुले मोठी झाल्याने शिक्षणासाठी बाहेरगावी गेली आहे. सहा मुले शिक्षणासाठी घराबाहेर आहेत. त्यातील कोमल ही मेघालय येथे आयआयएम, तर मोनल संगणक विभागात पदी घेत आहे. कीर्ती आयआयटी बी टेक (संगणक), सोहम बीएसस्सी, रोहीत अॅग्री, तर मोहन बीबीए आणि अॅग्री करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.