आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल:नागपूर मार्गावरील २४ गाड्या रद्द ; ऐनवेळी इतर गाड्यांचे आरक्षण मिळेना

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग, नॉन इंटर लॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील तब्बल २४ गाड्या रद्द झाल्या आहेत. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर असे सात दिवस या गाड्या धावणार नाहीत. ऐन गणेशोत्सवात रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसेल. नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील २४ गाड्या रद्द झाल्याने या गाड्यांच्या प्रवाशांची आरक्षित तिकीटे रद्द झाली आहेत. एेनवेळी कुठल्याही गाड्यांची तिकीटे मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होईल.

५ सप्टेंबरपर्यंत रद्द झालेल्या गाड्यांची नावे
शालिमार-एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस (१८०३०- १८०२९) ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, हावडा-मुंबई सीएसएमटी मेल (१२८१०-१२८०९), हावडा-अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस (१२८३४-१२८३३), हावडा-पुणे-हावडा आझादहिंद (१२१३०-१२१२९), एलटीटी-शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (३० आॅगस्ट, २ व ३ सप्टेंबर), शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्पेस १, ४ व ५ सप्टेंबर), हाटिया-पुणे (दि.२), पुणे-हाटिया (दि.४), हाटिया-एलटीटी (दि.२,३), एलटीटी-हाटिया (दि.४,५), पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर), शालिमार-पाेरबंदर (दि.२,३), संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस (दि.३), पुणे-संत्रागाची हमसफर (दि.५), हावडा-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (दि.१), साईनगर शिर्डी-हावडा एक्स्प्रेस (दि.३), ओखा-शालिमार (दि.४), शालिमार-ओखा एक्स्प्रेस (दि.६), टाटानगर -इतवारी एक्स्प्रे (४ सप्टेंबरपर्यंत), इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस (६ सप्टेंबरपर्यंत रद्द).

बातम्या आणखी आहेत...