आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायदा:रावेरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावर 25 टक्के सूट : श्रीराम पाटील

रावेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नुकताच तालुक्यातील केळीचे वादळाने नुकसान झाले. उद्योजक श्रीराम पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठिबक संचाच्या बिल रकमेवर २५ टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केला.

रावेरातील श्रीराम फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ.सुरेश पाटील, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, साईनाथ इरिगेशनचे संचालक अनिल पाटील, राजेंद्र चौधरी, घनशाम पाटील उपस्थित होते. उद्योजक पाटील म्हणाले की, तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची बुधवारी पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, यासाठी श्रीराम फाउंडेशनचे शिष्टमंडळ कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार आहे. तूर्त तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या समुहाचा ठिबक सिंचन संच घेण्यासाठी २५ टक्के सूट देणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...