आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं.निवडणूक:उमेदवारांना 25 ते 75 हजार रुपये खर्च मर्यादा; हिशेब न दिल्यास कारवाई शक्य

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारांना २५ ते ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे. मात्र, ग्रा.पं.च्या सदस्य संख्येनुसार ही मर्यादा असेल.

तसेच उमेदवारांना खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक आहे. अन्यथा गुन्हे दाखल हाेऊ शकतात. तालुक्यातील तळवेल, पिंपळगाव खुर्द, आेझरखेडा, कन्हाळे बुद्रूक, कन्हाळे खुर्द, माेंढाळा या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक हाेत आहे. या सर्व ठिकाणी सहा लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१, तर सदस्य पदांसाठी ११४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सदस्य संख्येनुसार मर्यादा
निवडणुकीत किती खर्च करावा? याबाबत निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्यांना २५ हजार रूपये, ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी ३५ हजार, ११ सदस्यीय ग्रा.पं.साठी ४५ हजार आणि १३ सदस्यीय ग्रा.पं.मधील उमेदवारांना ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च करता येईल. पण, या खर्चाचा हिशेब द्यावा लागेल. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...