आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:26 भक्तांनी रक्तदानातून जपले सामाजिक कर्तव्य

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रीराम नगर भागातील बाप्पा मोरया गणेश मंडळाने शनिवारी आयोजित शिबिरात २६ दात्यांनी रक्तदान केले. गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीच्या पथकाने रक्त संकलन केले.

शिबिराचे उद््घाटन यावल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांच्या हस्ते झाले. डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीचे डॉ.नितीन भारंबे, डॉ.आशिष सचदेव, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अजहर शेख, नईम शेख, शेख सकलैन, जावेद शेख, मंडळाचे संतोष भोई, गोपीचंद बारी, उज्वल घारू, राहुल बारी, विक्की जेधे, रितेश घारू, आकाश बारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...