आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:270 दात्यांचे रक्तदानातून अभिवादन ; महापरिनिर्वाण दिनी सामाजिक उपक्रम

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा विद्युत इंजिन कारखाना (पीओएच) व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिराचे आयाेजन केले हाेते. दोन्ही ठिकाणी एकूण २७० दात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले. पीओएचमध्ये १७०, तर बौद्ध विकास समितीच्या शिबिरात १०० दाते सहभागी झाले.

बाैद्ध विकास समितीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महारक्तदान शिबिर घेतले. डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजेपासून शिबिर सुरू झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत १०० दात्यांनी रक्तदान केले. प्रा.अनिल हिवाळे, अॅड. सुनील पगारे, सुमंगल अहिरे, रवींद्र ढिवरे, प्रवीण भालेराव, अजय वानखेडे, हर्षल वानखेडे, याेगेश देवरे उपस्थित हाेते. यानंतर सायंकाळी ५ वाजता चांदमारी चाळीतील शीलरत्न बुद्ध विहार येथून डाॅ.आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. अॅड.पगारे यांनी नेतृत्व केले.

पीओएच कारखान्यात उच्चांकी रक्तदान रेल्वेच्या पीओएच कारखान्यात ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लाॅईज असाेशिएशनच्या शिबिरात उच्चांकी १७० जणांनी रक्तदान केले. कारखाना प्रबंधक राजेश कुलहारी यांनी सर्वात आधी रक्तदानाने शिबिराचे उद््घाटन केले. संघटनेचे अध्यक्ष शांतराम जाधव, सचिव एन.एम. निंबाेलकर ईश्वर खंडारे, विकास अंभाेरे, अमाेल वाघमारे, दिनेश तायडे, भुपेद्र गाेंडाणे, नीलेश खंडारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...