आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जण किरकोळ जखमी:जामनेर राेडवरील खड्ड्यांत पडून दिवसभरात 3  जखमी

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर राेडवर मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्त केल्यावर रस्त्याची व्यवस्थित दबाई झाली नाही. यामुळे तेथे पडलेल्या तीन खड्ड्यांमध्ये पडून मंगळवारी दिवसभरात तीन जण किरकोळ जखमी झाले.जलवाहिनी दुरुस्तीनंतर खड्डे व्यवस्थित बुजले नाहीत. वाहनांच्या वजनामुळे माती दाबली जावून रस्त्यावर खोलगट भाग तयार झाला आहे. एकाच मार्गावर केवळ १० ते १५ मीटर अंतरावर असे तीन खड्डे आहेत.

मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजता नाहाटा चाैफुलीकडून दुचाकीने शहरात येणारे शिक्षक युवराज कुरकुरे वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने खड्ड्यात पडले. इतरांनी उचलून त्यांना दवाखान्यात नेले. याच पद्धतीने इतरही दोघे खड्ड्यात पडून जखमी झाले. तर तर गेल्या आठवड्यापासून सुमारे १५ जण जखमी झाले आहेत.

...तर न्यायालयात जाणार
पालिका प्रशासन उघड्या डाेळ्यांनी होणारा त्रास पाहात आहे. पालिका रस्ता दुरुस्तीला तयार नसेल तर किमान जखमींच्या उपचाराचा खर्च तरी करावा. येत्या चार दिवसात उपाययोजना न केल्यास न्यायालयात धाव घेऊ.

चंद्रकांत चाैधरी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळअचानक खंडित झाल्याने खड्ड्यात पडले. इतरांनी उचलून त्यांना दवाखान्यात नेले. याच पद्धतीने इतरही दोघे खड्ड्यात पडून जखमी झाले. तर तर गेल्या आठवड्यापासून सुमारे १५ जण जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...