आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावदा:सावद्यात 20 पैकी 3 जागा आरक्षित प्रवर्गासाठी, सर्व मातब्बर सुरक्षित

सावदा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा येथे १० प्रभागांमधील २० जागांसाठीचे आरक्षण फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडगल, पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. श्लोक भारंबे या विद्यार्थ्याने अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षणाची चिठ्ठी काढली. दरम्यान, आरक्षण सोडतीची प्रक्रिया होऊन देखील सावदा शहरात पालिका निवडणुकीसाठी फारसा उत्साह नाही. कारण, या सोडतीला प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित होते.

लोकसंख्या वाढीमुळे सावदा पालिकेत आता १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून जातील. या सर्व १ ते १० प्रभागांसाठीचे अ आणि ब अनुक्रमांचे आरक्षण पुढीलप्रमाणे असेल. प्रभाग क्र.१ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग २ - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग ३ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग ४ अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला. प्रभाग ५ अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण. प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला. प्रभाग ८ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ९ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग १० सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. दरम्यान, सोडत काढताना प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख सूरज परदेशी, भरत नेहते, धनंजय चौधरी, माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, माजी नगरसेविका सुभद्रा बडगे, प्रहार संघटनेचे दुर्गदास धांडे, मनीष पाटील, नीलेश खाचणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...