आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:ख्रिसमस, थर्टी फर्स्टनिमित्त 30 विशेष रेल्वे; पुणे, मुंबई, नागपूरला जाणाऱ्यांना दिलासा

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेने ख्रिसमस व थर्टी फर्स्टनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन ३० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ७ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान पुणे-नागपूर साप्ताहिक गाडी दर बुधवारी दुपारी १.३० वाजता ०१४५२ नागपूर स्थानकावरून सुटेल. ०१४५२ ही विशेष गाडी ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या दरम्यान दर गुरुवारी १०.४५ वाजता पुण्याहून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल.मुंबई-नागापूर साप्ताहिक स्पेशल ०१४४९ एलटीटी येथून दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...