आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:रन फॉर युनिटीत धावले भुसावळचे 300  धावपटू

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ वी जयंतीनिमित्त खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे रविवारी (दि.६) रन फॉर युनिटी स्पर्धा घेण्यात आली. ५ व ३ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत तब्बल ३०० भुसावळकरांना सहभाग घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवारी शहरातील प्रमुख मार्गावर रन फॉर युनिटी ही मॅरेथॉन घेण्यात आली. अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या डॉ. वंदना वाकचौरे, प्राचार्या मनीषा बाविस्कर, राजेश टंडन, होमगार्ड विभागाचे सुरेश इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ, स्पोर्ट्स क्लबचे योगेश तिवारी, नवीन कुकरेजा, राजेश प्रजापती, तुषार सुरवाडे उपस्थित होते.डॉ.आंबेडकर मैदानावर हिरवी झेंडी स्पर्धेला प्रारंभ झाला. तीन व पाच किमी अंतराच्या स्पर्धेत जामनेर रोडवरुन स्पर्धक धावले. त्यात दोन्ही गटात प्रत्येकी १६ अशा ३२ स्पर्धकांना चषक देण्यात आले. सहभागी रनरला प्रमाणपत्र, गुडी बॅग देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...