आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीई कायद्यांतर्गत तालुक्यातील २० शाळांमध्ये ३०० जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव जागांवर, १ मार्चपासून ऑनलाइन अर्जासाठी सुरुवात झाली आहे. १७ मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. बुधवारी (दि. १) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर संचालक कार्यालयामार्फत राज्यस्तरावर संपूर्ण राज्याची ऑनलाइन लॉटरी काढण्यात येईल. व त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल .तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचा प्रवेश अंतिम करण्यात येईल. पालकांनी अधिक माहितीसाठी गटसाधन केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केली आहे.
या शाळांमध्ये प्रवेश
डॉ. उल्हास पाटील स्कूल,आदर्श प्रायमरी स्कूल, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ संस्कृती स्कूल, एन. के. नारखेडे इंग्लिश स्कूल, पंडीत नेहरु प्रायमरी स्कूल वराडसीम, सरदार पटेल स्कूल, श्रीनाथ इंग्लिश स्कूल वरणगाव, स्वामीनारायण गुरुकूल, स्वामी नारायण गुरुकूल मराठी मीडियमसाकेगाव, ताप्ती स्कूल, द वर्ल्ड स्कूल स्कूल किन्ही, बियाणी इंगिल्श मीडियम, बियाणी मराठी मीडियम, चाटे स्कूल वरणगाव, श्रीराम प्रायमरी स्कूल कुऱ्हे पानाचे, बियाणी पब्लिक स्कूल, दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यामंदिर सुनसगाव, श्री गुरुकृपा इंग्लिश स्कूल, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल तळवेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.