आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी उत्तीर्ण:तालुक्यातील सहा महाविद्यालयांत 3060 जागा; बारावी उत्तीर्ण 3732 ; गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रक्रिया

भुसावळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात पदवीच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन होणार आहे. त्यामुळे गुणपत्रकाशिवाय प्रवेश होणार नाही. मात्र, प्रवेशाला उशीर होऊ नये यासाठी काही महाविद्यालयांत ऑनलाइन नावनोंदणी सुरु आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालये गाठून चौकशी केली. बारावीचा आॅनलाइन निकाल बुधवारी लागला. दरम्यान, भुसावळ शहरात पाच आणि वरणगाव येथील एक असे तालुक्यात सहा महाविद्यालये असून तेथे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या एकूण ३ हजार ६० जागा आहेत. तर बुधवारी लागलेल्या बारावीच्या निकालात ३ हजार ७३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कॉलेजमधील शाखानिहाय जागा शैक्षणिक संस्थेचे नाव कला विज्ञान वाणिज्य नाहाटा महाविद्यालय ३२० ३२० ४०० भोळे महाविद्यालय ३६० १२० १२० कोटेचा महिला कॉलेज २४० १२० २४० एन.के.नारखेडे कॉलेज ०००० १०० ००० गाडगेबाबा हिंदी कॉलेज १२० ००० १२० वरणगाव महाविद्यालय २४० १२० १२०

महाविद्यालयांनी केली नाव नोंदणी बुधवारी निकाल लागल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांनी गुण पत्रिकेच्या प्रती काढून घेतल्या. या प्रती घेऊन त्यांनी गुरुवारी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चौकशी करताना दिसले. मात्र, गुरुवारी प्रत्यक्ष गुणपत्रक उपलब्ध होईल. यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचे महाविद्यालयांतर्फे सांगितले. पण, काहींनी प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व संपर्क क्रमांक नोंद करून घेतले.

बातम्या आणखी आहेत...