आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू जप्त:चोरवड शिवारात हॉटेलमधून 31 हजारांची दारू जप्त ; अवैध दारू विक्री होत डीवायएसपी असल्याची माहिती वाघचौरे यांना मिळाली

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोरवड शिवारातील भागाई हॉटेलमध्ये अवैधपणे दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने सोमवारी रात्री १० वाजता कारवाई केली. त्यात ३१ हजार रूपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. भागाई हॉटेलमधून अअवैध दारू विक्री होत असल्याची माहिती डीवायएसपी वाघचौरे यांना मिळाली. त्यांनी सपोनि हरिश भोये, नंदकिशोर सोनवणे, रमण सुरळकर यांना कारवाईची सूचना केली. या पथकाने दोन पंच सोबत घेत रात्री १०.०५ वाजता छापा टाकला. हॉटेलच्या मागील एका खोलीत दारूच्या बाटल्या सापडल्या. निवृत्ती नामदेव पवार यास ताब्यात घेत मद्यसाठा जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...