आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज कर्मचाऱ्यांच्या संपाला शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. महावितरणचे विभागातील ३८० कर्मचारी संपात सहभागी झाले. तर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १२५० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. दीपनगरातील वीज निर्मितीवर परिणाम झाला नसला तरी भुसावळ शहरातील वीजपुरवठ्याचा खोळंबा झाला. खेडी १३२ सबस्टेशनवरुन तापी नगर सबस्टेशनला पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाइनमध्ये बिघाड झाल्याने उत्तर भागातील वीजपुरवठा तब्बल साडेतीन तास खंडित झाला. शहरातील सर्वच भागात फ्यूज बिघाड व किरकोळ कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अर्धा तासाऐवजी दोन तास प्रतीक्षा करावी लागली. खासगीकरणाला विरोध व विविध प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांनी ७२ तासांचा संप सुरु केला. पहिल्याच दिवशी या संपाने शहरातील वीजपुरवठ्याचा फज्जा उडाला. शहरातील उत्तर व दक्षिण भागातील वीजपुरवठा सहा वेळा ट्रिप झाला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खेडी १३२ केव्ही सबस्टेशनवरुन तापी नगर ३३ बाय ११ केव्ही सबस्टेशनला पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर बिघाड झाला.
कर्मचारी नसल्याने परमीटसाठी कार्यकारी अभियंता स्वत: गेले खेडी १३२ केव्ही सबस्टेशन ते तापीनगर सबस्टेशनदरम्यान झालेल्या बिघाडामुळे उत्तर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अशा स्थितीत परमीट देण्यासाठी वायरमन कर्मचारी घटनास्थळी किंवा सबस्टेशनमध्ये जातो. पण, हे कर्मचारी नसल्याने परमीट देण्यासाठी स्वत: कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना जावे लागले. खेडी ते नाहाटा चौफुलीदरम्यानच्या तपासणी कामात ते स्वत: हजर होते.
दीपनगर केंद्रातून ८०० मेगावॅट वीजपुरवठा दीपनगर औष्णिक केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक चार आणि पाच कार्यान्वित होते. केंद्रातील तब्बल १२५० कर्मचारी, अभियंत्यांनी संपात सहभाग घेतला. महानिर्मितीने संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मुख्यालय, मे. भेल आणि सेवानिवृत्त अभियंत्यांचा समावेश असलेली सुमारे ९० जणांची टीम सज्ज ठेवली होती. यामुळे संपादरम्यान दीपनगरातील दोन्ही संचांतून८०० मेगावॅट वीजनिर्मिती झाली.दीपनगर केंद्रात मंगळवारी रात्री १२ वाजेपासून वीज कामगारांनी संप सुरु केला. महानिर्मितीने संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी मे. भेल,मुंबई मुख्यालय व सेवानिवृत्त अभियंत्यांना पाचारण केले. ९० जणांचे पथक प्रत्येक शिफ्टमध्ये विभागून देण्यात आले होते. यासोबतच ठेकेदाराचे कर्मचारी सहभागी असल्याने वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान दुपारी साडेचार वाजता संपावर तोडगा निघाला. रात्रीच्या शिफ्टवर कामगार हजर झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर संपाचा परिणाम झाला नाही, अशी माहिती मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिली.
दुरुस्तीची कामे करताना ठेकेदाराचे कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात संपकरी कर्मचारी. बँकेचे कामकाजही ठप्प उत्तर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज ठप्प झाले. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने बँकेत पेन्शनर्स कर्मचाऱ्यांची गर्दी होती. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बँकेकडे जनरेटर किंवा इर्न्व्हटरची सक्षम सुविधा नसल्याने यंत्रणा बंद झाली. यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांचे धरणे, सरकारविरुद्ध निदर्शने संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी तापीनगरातील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शासनाचे खासगीकरण धोरण, तिन्ही कंपन्यांचे समांतर वीज परवाना देण्याचा प्रयत्नांचा निषेध व निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी संघर्ष समितीमधील सर्व ३० युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
४० तक्रारींचे निवारण महावितरणकडे बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बिघाडाच्या सुमारे ४० तक्रारी दाखल झाल्या. सर्वाधिक प्रोफेसर कॉलनीतील सहा ठिकाणी बिघाड झाला. महावितरणचे कर्मचारी किरकोळ बिघाड दुरुस्तीसाठी अर्धा तासाचा वेळ घेतात. पण, प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून हा बिघाड दुरुस्तीसाठी एक ते दोन तासांचा वेळ लागला.
बँकेचे कामकाजही ठप्प उत्तर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज ठप्प झाले. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने बँकेत पेन्शनर्स कर्मचाऱ्यांची गर्दी होती. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बँकेकडे जनरेटर किंवा इर्न्व्हटरची सक्षम सुविधा नसल्याने यंत्रणा बंद झाली. यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांचे धरणे, सरकारविरुद्ध निदर्शने संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी तापीनगरातील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शासनाचे खासगीकरण धोरण, तिन्ही कंपन्यांचे समांतर वीज परवाना देण्याचा प्रयत्नांचा निषेध व निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी संघर्ष समितीमधील सर्व ३० युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ढगाळ वातावरण पिकांना घातक, गव्हावर कीडरोग वाढणार गव्हावर किडरोगाचा प्रादूर्भाव वाढू शकेल. ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या गहू पिकावर किटकजन्य व बुरशीजन्य आजार वाढण्याची भिती आहे. असे ढगाळ वातावरण अधिक काळ राहिल्यास गव्हावर तांबेरा तर हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.