आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध नळ जाेडणी:अमळनेर शहरात आढळले 34  अवैध नळ कनेक्शन‎

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेतर्फे शहरात अवैध नळ‎ कनेक्शन शोध मोहीम सुरु असून शहरातील विविध‎ भागात नागरिकांचे अवैध नळ कनेक्शन तपासणी सुरू‎ आहे. यात जवळपास ३४ अवैध नळ जाेडणी आढळून‎ आली. दरम्यान, नागरिकांनी अवैध नळ जाेडणी‎ केल्यास दंडनीय कारवाई केली जाईल, असा इशारा‎ मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

मंगळ ग्रह मंदिर‎ जवळील परिसरात ५ अवैध नळ कनेक्शन, गोहिल‎ नगर, पालिका हद्दीबाहेर परिसरात ७ तर माळी वाडा‎ परिसरात २२ अवैध नळजोडणी आढळल्या.‎ नगरपालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या विशेष माेहिमेत‎ ही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...