आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:फैजपूर येथे 350 गुण‌वंतांचा सत्कार; मुस्लिम खाटीक समाजाचा पुढाकार, तीन राज्यातील बांधवांची उपस्थिती

फैजपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे फैजपुरात गुणगौरव समारंभ पार पडला. फैजपूर, रावेर, चोपडा व वरणगाव खाटीक समाजाने फैजपूर शहरातील सुमंगल लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमधील ३५० विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. दहावी, बारावीसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील या क्षेत्रातील हे गुणवंत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी शेख एल (मुंबई), तर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार मनीष जैन, भुसावळचे अनिल चौधरी, जळगावचे हारून मुक्ती नदवी, करीम सालार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, चाळीसगावचे शेख कैसर चाळीसगाव, आसीम खान, शिरपूरचे साजिद शेख शिरपूर, धुळे येथील वसीम शेख, रावेरचे डॉ.शब्बीर, वरणगावचे अमजद शेख, शेख कुर्बान, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, एपीआय सिद्धेश्वर अखेगावकर आदी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार चौधरी यांनी, आजच्या काळात शिक्षणाची गरज आहे. विशेषता महिलांनी शिक्षण घ्यावे. खाटीक समाजातील विद्यार्थ्यांनी मार्केटिंग शिक्षणात पुढे यावे, असे सल्ला दिला. मनीष जैन, करीम सालार, रवींद्र पाटील, डॉ. निकत, असीम खान यांनी मनोगत व्यक्त केले. अन्वर खाटीक, कलीम हाजी सलीम, अख्तर अकबर खाटीक, शरीफ शेख, फारुक शेख गुलाब, आसिफ शेख अय्युब आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...