आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:36 मंडळांनी दिला पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप, संबळ वाद्याने रंगत; यावलमध्ये शांतता समिती पदाधिकाऱ्यांनी केले मिरवणुकीचे स्वागत

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यातील पाच गावातील पाच दिवसांच्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात आला. सकाळी पोलिसांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यासह रुट मार्च काढला. यानंतर दुपारी मिरवणुकीला सुरुवात झाली. काही मंडळांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात सकाळीच श्रींची मिरवणूक काढून दुपारी विसर्जन आटोपले. तर मुख्य मिरवणूक रात्री उशीरापर्यंत चालली. ती शांततेत आटोपली.

पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील २१ मंडळांनी भक्तिभावाने निरोप निरोप दिला. रविवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सीआरपीएफचे अधिकारी इंद्रनिल दत्ता, शशिकांत रॉय, संतोषकुमार यादव, गुलाबसिंग झारिया यांच्यासह १०० सशस्त्र जवान, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, होमगार्ड अशा कर्मचाऱ्यांनी शहरातील विसर्जन मार्गावरून रूट मार्च काढला. पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन असलेल्या नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव व सावखेडासीम येथेही बंदोबस्त लावला होता. यावल शहरात सकाळी बारी वाडा गणेश मंडळाने पारंपरिक वाद्यांच्या सहभागाने मिरवणूक काढून दुपारी विसर्जन केले. यानंतर मुख्य मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत ही मिरवणूक शांततेत पार पडली. शहरातील काझी मशिदीजवळ शांतता समिती पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले.

पालिका, श्री सदस्यांकडून निर्माल्य संकलन
गणेस विसर्जन मिरवणुका शहरातील रेणुका माता मंदिराजवळ विसर्जित होतात. पुढे तारकेश्वर महादेव मंदिराकडून विसर्जनासाठी मंडळ मार्गस्थ होतात. तारकेश्वर महादेव मंदिरा मागे पालिकेकडून विसर्जन कुंड उभारले होते. तेथे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे श्री सदस्य आणि नगरपालिकेकडून निर्माल्य संकलन केंद्र उभारले होते. अनेक मंडळांनी पूजा साहित्य व निर्माल्य अर्पण केले.

असे झाले विसर्जन
पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील २१ मंडळांनी तसेच नायगाव येथील एक गाव एक गणपती, कोरपावली गावातील ४ सार्वजनिक, डांभुर्णीतील ६ मंडळे, दहिगाव ३ आणि सावखेडासिम येथे १ गणोशोत्सव मंडळाने बाप्पाला निरोप दिला.

बातम्या आणखी आहेत...