आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:विष प्राशन करून 36 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या ; पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली

धामणगाव बढेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३६ वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. ही घटना आज ३ जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मोताळा तालुक्यातील तपोवन येथे घडली आहे. प्रमोद शंकर पर्वते असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. तपोवन येथील मृताचा भाऊ विनोद शंकर पर्वते यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार माझा भाऊ प्रमोद शंकर पर्वते वय ३६ हा सकाळी त्याच्या पत्नीस सांगून पोफळी येथे दुचाकीने सलूनच्या दुकानावर जातो, असे सांगून घरातून निघून गेला. काही वेळानंतर गावातील कैलास सीताराम काकड यांनी फोन द्वारे सांगितले की, तुझा भाऊ प्रमोद पर्वते यांनी माझ्या मोबाइलवर फोन लावून सांगितले की, मी दांडगे यांच्या मळ्याजवळ उभा असून विष औषध प्राशन केल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच मी लगेच भावाच्या शोधात धामणगाव बढे येथील दांडगे यांच्या मळ्याजवळ पोहोचलाे. त्यावेळी भाऊ प्रमोद याची दुचाकी घटनास्थळी दिसून आली. परंतु प्रमोद हा तेथे मिळून आला नाही. तेव्हा मी आजूबाजूला शोध घेतला असता एका पडीक जंगलात प्रमोद हा जमिनीवर खाली पडलेला दिसून आला. यावेळी त्याच्या नाका तोंडातून फेस बाहेर आलेला दिसला. तसेच त्याच्या शेजारी विषाची बाटली मिळून आली. तो मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका सुरेश सोनवणे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...