आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण प्रकल्प:सत्तांतराचा फटका, 3600 घरांच्या गृहनिर्माण प्रकल्पाला पुन्हा मोगरी

हेमंत जोशी | भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढल्याने बेघर झालेले व शहरातील अत्यल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी म्हाडाच्या माध्यमातून ३,६०० घरांचा गृहनिर्माण प्रकल्प पालिकेच्या सर्वे क्रमांक ६३ वर नियोजित आहे. मात्र, या जागेवर आधीच उद्यानाचे आरक्षण आहे. हे आरक्षण उठवण्याची प्रक्रिया सुरु असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे आरक्षण बदलण्यासाठी अद्याप कॅबिनेटची मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे गृहनिर्माण व कामगार कल्याण विभागाकडून यापूर्वी मिळणाऱ्या प्रती घर २ लाख रुपये अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील रेल्वे अतिक्रमणामुळे विस्तापित, अल्प उत्पन्न गट व वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या गरजुंसाठी म्हाडाच्या माध्यमातून ७ हजार ६०० घरांच्या प्रकल्प नियोजित आहे. यापैकी ३,६०० घरांचा प्रकल्प पहिल्या टप्प्यात साकारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री - उर्वरित पान ४

प्रक्रिया रेंगाळली, पण सरकारी मंजुरी मिळवू रेल्वेने अतिक्रमण काढले तेव्हापासून बेघरांना घरकुल मिळावे, यासाठी मी पाठपुरावा सुरु केला. सरकार बदलल्याने ही प्रक्रिया रेंगाळली असली तरी आताच्या सरकारकडून देखील मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे. बेघर, अल्प उत्पन्नगट व भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना हक्काचे घर मिळवून देऊ. एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी

फडणवीसांच्या माध्यमातून प्रस्ताव
सन २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हौसिंग बोर्डाकडे घरकुलांचा प्रस्ताव दिला होता. नंतर राज्यात सत्ता बदलली. आता पुन्हा भाजपची सत्ता आली. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जागेवरील आरक्षण बदलासाठी पाठपुरावा करु. संजय सावकारे, आमदार, भाजप

आरक्षण बदलणे हा पर्याय
तापीनदी खोऱ्यातील राहुल नगरच्या उत्तरेकडे असलेल्या सर्वे क्रमांक ६३ ची जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. ३६०० घरकुलांसाठी सध्यातरी हीच जागा सोयीची आहे. प्रकल्प पालिकेचा असल्याने पालिका हद्दीतील जागाच वापरता येईल. शहरातील इतर भागात पालिकेची इतकी मोठी व सोयीची जागा उपलब्ध नाही. यामुळे या जागेवरील उद्यानाचे आरक्षण बदलण्याशिवाय पर्याय नाही.

बातम्या आणखी आहेत...