आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपुष्यामृत योग:दिवसभरात ४ किलो सोने विक्री ;  बिस्किट, तुकडा खरेदीवर ग्राहकांचा सर्वाधिक भर

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुपुष्यामृताच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सराफ बाजार ग्राहकांनी भरला होता. बहुतेक ग्राहकांनी सोन्याची बिस्किटे आणि सोन्याचा तुकडा खरेदीला प्राधान्य दिले. दिवसभरात दागिने, बिस्किटे आणि तुकडा मिळून सुमारे चार किलो पेक्षा जास्त सोन्याची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गुरुवारी सोन्याचा भाव ५२,५०० रुपये तोळे होता. दरम्यान, गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून महिलांनी कानातील टॉप्स, बांगड्या, अंगठी, गळ्यातील चेन आदी वस्तूंची खरेदी केली.

काही ग्राहकांनी सोन्याचे बिस्कीट आणि तुकडा खरेदीस प्राधान्य दिले. एक ग्रॅम वजनापासून ते ग्राहकाच्या मागणीनुसारच्या वजनात हा तुकडा, बिस्कीट उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान, गुरुपुष्यामृतात गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंतचा मुहूर्त अधिक महत्त्वाचा मानला गेला. या काळात अनेक ग्राहकांनी आर्थिक कुवतीनुसार सुवर्ण खरेदी केले असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...