आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन मागे:45 सुरक्षारक्षकांना मिळणार रोजगार

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर औष्णिक केंद्र ते वेल्हाळे अॅश पाइपलाइनवरील ४५ सुरक्षा रक्षक अडीच महिन्यांपासून बेरोजगार झाले होते. महानिर्मितीने त्यांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने गुरुवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु होते. महानिर्मितीने या सुरक्षा रक्षकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिल्याने शनिवारी आंदोलनाची सांगता झाली.

लोकसंघर्ष मोर्च्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत चौधरी, लोकसंघर्ष मोर्च्याचे भुसावळ युवक अध्यक्ष आकाश कुरकुरे, रुपेश पाटील, गणेश पाटील, नंदू गायकवाड, दीपक लोहार, श्रीकांत निकम, हेमंत तायडे हे उपस्थित होते. सकारात्मक चर्चेमुळे आंदोलकांनी शनिवारी सकाळी ११ वाजता आंदोलन मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...