आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धा उपक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी आठ शाळांमधून ३९ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये एकूण ४९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट रुचिका शर्मा, सेक्रेटरी प्राची राणे, पी.ए.पी. डाॅ. रश्मी शर्मा, व्हाईस प्रेसिडेंट अलका भटकर, पी. पी. मनिषा तायडे, कमल सचदेव, रजनी सावकारे, विद्या भोळे, सविता शुक्ला, राजश्री कात्यायानी, सुनंदा भरूले आणि संगिता जाधवानी आदी सदस्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला जज म्हणून गिरीश कुलकर्णी आणि माधुरी गुजर यांनी काम पाहिले. त्यांनी विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली.
या प्रदर्शनात इयत्ता चौथी ते सातवीच्या गटात पहिले बक्षीस आराध्या दुबे, दुसरे बक्षीस केतन सपकाळे, मितेश राठोड, तिसरे बक्षीस पार्थ व लिखित पाटील, चौथे बक्षीस यश वऱ्हाडे, पाचवे बक्षीस चेतना नेरकर व सेजल चौधरी यांना देण्यात आले. तर इयत्ता आठवी ते दहावी गटात पहिले बक्षीस लोचन सरोदे, कार्तिकेय भोळे, किरण ठाकूर, दुसरे बक्षीस निकीता कोळी, तिसरे बक्षीस जयश्री वाधवानी, चौथे बक्षीस प्रांजल कुकरेजा, सुहानी गुरनामी आणि पाचवे बक्षीस गुंजन भंगाळे यांना देण्यात आले. प्रोजेक्ट चेअरमन मनिषा तायडे, डाॅ.प्रेरणा चौधरी यांनी बक्षीसे उपलब्ध केली . सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.