आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेट:वर्षभरात जमीन, घरे, फ्लॅट खरेदीत 5 टक्के वाढ; तुकडाबंदीने प्लॉटचे व्यवहार मात्र ठप्प

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात तयार घरे, फ्लॅट, ड्युप्लेक्स बंगलो, रो हाऊस व इतर मालमत्तांची खरेदी वाढली. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या वर्षभरात एकूण ६,१२९ तर ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या वर्षभरात ६,४४८ खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी दुय्यम निबंधकांकडे झाली. वर्षभरातील ही व्यवहार संख्या ३१९ने म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ५ टक्के जास्त आहे. असे असले तरी यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या सणासुदीच्या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार घटले.

भुसावळ शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. प्रामुख्याने तयार घरांना अधिक मागणी आहे. शहरात ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या १२ महिन्यांच्या काळात ६ हजार १२९ व्यवहारांची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी झाली. या तुलनेत ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या वर्षभरात ६ हजार ४४८ व्यवहार झाले. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, त्यात प्रामुख्याने सणासुदीच्या दिवसात अपेक्षित वाढ नोंदवली गेलेली नाही. कारण, प्लॉटच्या तुकडा बंदीच्या कायद्यामुळे अनेक खरेदी-विक्री व्यवहारांना ब्रेक लागल्याचे समोर आले.

संख्या २१४ने कमी ऑगस्ट ते ऑक्टोबर या सणासुदीच्या काळात व्यवहार वाढणे अपेक्षित असते. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या २१४ने कमी आहे. मात्र, संपूर्ण वर्षभराची तुलनेत करता यंदा व्यवहारांमध्ये सरासरी ५ टक्के वाढ झाली आहे.

टोकन देऊन सौदेपावती सणासुदीच्या ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. मात्र, अधिकृत नोंदणी झालेला नसल्याने आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसत आहे. याचे कारण म्हणजे बहुतांश व्यवहारांत केवळ सौदे पावती झाली.

सणासुदीत व्यवहार घटल्याची प्रमुख कारणे 1 पहिल्या घराच्या खरेदीत नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत होता. गृह कर्जाच्या मूळ रक्कमेत २ लाख ६७ हजार रुपये अनुदान जमा केले जात होते. ही योजना मार्च २०२२ पासून बंद झाली. ही योजना पुन्हा सुरु होईल, या आशेवर ग्राहक थांबले आहेत. 2 तुकडाबंदी कायद्यानुसार शेतजमिनींचे हस्तांतर करताना जमिनीचा तुकडा पाडता येत नाही. निर्धारित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या दस्तांची नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी किंवा ना-हरकत प्रमाणपत्रा शिवाय करू नये, अशी अट आहे. 3 ‘रेरा’मधील तरतुदींनुसार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बांधकाम किंवा बांधकाम प्रकल्पांमध्ये आठपेक्षा जास्त सदनिका असल्यास त्या प्रकल्पांची नोंदणी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे करावी लागते. ही प्रक्रिया क्लिष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...