आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना मनस्ताप:तिसऱ्या दिवशीही 50 बसफेऱ्या रद्द; 5 हजार प्रवाशांची गैरसोय

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या भुसावळ आगाराच्या २० पैकी १७ बसेस गुरुवारी देखील परतल्या नाहीत. यामुळे दिवसभरात नाशिक, अकोला, मेहकर या लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील मिळून ५० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याचा सुमारे ५ हजार प्रवाशांना मनस्ताप झाला. त्यामुळे काहींनी रेल्वे गाड्यांनी प्रवास केला. तर काहींनी एसटीने ब्रेक जर्नी करत नियोजित ठिकाण गाठले.

त्यात दुर्गा विसर्जन मिरवणुकीमुळे बसस्थानक बस डेपोत हलवले होते. तेथे गाड्या विलंबाने आल्याने हाल झाले.मुंबईतील मेळाव्यासाठी भुसावळ आगाराच्या ४० पैकी २० बसेस मंगळवारी सकाळी पाचोरा येथे पाठवल्या होत्या. तेथून या बसेस मुंबईला रवाना झाल्या. यामुळे मंगळवार, बुधवारी लांब पल्ल्याच्या १०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

रेल्वेचा घेतला आधार
लांब पल्ल्याच्या बसेस रद्द केल्याने सुमारे पाच हजार प्रवाशांना मनस्ताप झाला. त्यामुळे काहींनी रेल्वे, तर कुणी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घेतला. अकाेलाकडे जाणाऱ्यांनी पॅसेंजर गाड्या, महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास केला.

आजपासून सुरळीत सेवा
शुक्रवारपासून भुसावळ आगाराच्या सर्व बसेस पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे धावतील. त्यामुळे गैरसोय टळेल. तसेच दिवाळीच्या दृष्टीने १७ ऑक्टोबरपासून पुण्यासाठी विशेष गाड्या साेडणार आहोत. पी.बी.भाेई, वाहतूक नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...