आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:जंक्शनवर 12 दिवसांत‎ 50 प्रवाशांवर उपचार‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे प्रशासनाने भुसावळ रेल्वे‎ स्थानकावर वैद्यकीय सुविधा‎ उपलब्ध केली आहे. ही सुविधा २०‎ जानेवारीपासून उपलब्ध झाली.‎ यानंतर ३१ जानेवारी पर्यंतच्या १२‎ दिवसांत पथकाकडून ५० प्रवाशांची‎ गाडी स्थानकावर येताच तपासणी‎ करण्यात आली. यामुळे आजारी‎ प्रवाशांना दिलासा मिळाला.‎ येथील रेल्वे स्थानकावर २०‎ जानेवारीला मुसाफिरखान्यात‎ वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला.‎ यापूर्वी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या‎ प्रवाशांना वैद्यकीय सेवेची गरज‎ असल्यास शहरात जाऊन‎ दवाखान्यांचा शाेध घ्यावा‎ लागायचा.

आता रेल्वे स्थानकातच‎ ही सुविधा उपलब्ध झाली आहे.‎ यासाेबत धावत्या रेल्वे गाडीत सुद्धा‎ प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास‎ पुढील स्थानकावर वैद्यकीय सेवा‎ उपलब्ध करून दिली जाते. रेल्वे‎ स्थानकावरील वैद्यकीय कक्षात‎ पाेटदुखी, ताप, हगवण आदी‎ किरकोळ आजारांवर तत्काळ‎ उपचार हाेऊन प्रवाशांना लाभ‎ मिळतो. दरम्यान, २० ते ३१‎ जानेवारीदरम्यान या कक्षात ३७, तर‎ धावत्या गाडीत आजारी पडलेल्या‎ ५० रूग्ण प्रवाशांवर उपचार‎ करण्यात आले. ही वैद्यकीय सुविधा‎ २४ तास सुरू असते. तेथे तीन‎ पाळ्यांमध्ये डॉक्टर व कर्मचारी‎ नेमले आहेत. ते रेल्वे प्रवाशांना‎ आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा‎ देत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...