आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या पालिका निवडणुकीत आपल्या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ‘दिव्य मराठी’च्या आॅनलाइन सर्वेक्षणात तब्बल ५५ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असे शहरातील विविध भागातील सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या २०.०३ टक्के लोकांना वाटते आहे.
‘दिव्य मराठी’च्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त भुसावळ शहरातील विविध क्षेत्रातील हजारो व्यक्तींना आॅनलाइन सर्वेक्षणाचे फाॅर्म पाठवण्यात आले होते. सर्वच प्रभागातील नगरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. त्यात गृहिणी, व्यापारी, नोकरदार, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, डाॅक्टर्स, अभियंते, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींचा समावेश होता. एकूण ८,४२० जणांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला.
शहरातील नागरिकांच्या भावना जाणून घेणे आणि त्या माध्यमातून भुसावळ पालिकेत सत्ता मिळवू इच्छिणाऱ्यांना कामाची पुढची दिशा आणि कार्यपद्धती ठरवण्यासाठी जनभावना कळवणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. त्यातून आलेले काही निष्कर्ष अपेक्षित असेच असले तरी काही निष्कर्ष मात्र आश्चर्य वाटायला लावणारे आहेत.
१. नगरसेवकाच्या कामगिरीवर समाधान
७,९०१ जणांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यातील ३१.९ टक्के नागरिक आपल्या नगरसेवकाच्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी असल्याचे सांगताहेत. शहरातील नागरी सुविधांची एकूण अवस्था पाहता समाधानी नागरिकांचे प्रमाण धक्कादायक आहे. ३८.४ टक्के लोकांनी पूर्ण असमाधान व्यक्त केले आहे, तर १९.६ टक्के नागरिक काही प्रमाणात समाधानी असल्याचे सांगताहेत.
२. लोकनियुक्त नगराध्यक्षांबाबतचे समाधान
शहरातील नागरिकांनी रमण भोळे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. त्यावेळी ते भारतीय जनता पक्षात होते. त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का? या प्रश्नावर तब्बल ६८.४ टक्के लोकांनी आपण अजिबात समाधानी नसल्याचे मत नाेंदवले आहे. १७.७ टक्के लोकांनी मात्र काही प्रमाणातच समाधानी असल्याचे म्हटले आहे. ९.१ टक्के लोकं मात्र रमण भोळे यांच्या कामगिरीवर पूर्ण समाधानी आहेत.
३. समाधानकारक कामे न होणे हा पराभव कोणाचा?
या प्रश्नावर ७ हजार ८२० जणांनी मते नोंदवली आहेत. त्यापैकी २९.२ टक्के लोकांनी तो पराभव रमण भोळे यांचाच असल्याचे नमूद केले आहे. तर २२.४ टक्के लोकांना मात्र हा पराभव भाजपच्या नेतृत्वाचाच असल्याचे वाटते आहे. याशिवाय १८ टक्के लोकांना तो मतदारांचा पराभव वाटतो, तर १३.७ टक्के लोकांना मात्र नगरसेवक आणि विरोधी पक्षाचा तो पराभव असल्याचे वाटते आहे. १६.८ टक्के लोकांना मात्र याबाबत मत निश्चित करता आलेले नाही.
४. कोणत्या कामाकडे सर्वाधिक दुर्लक्ष? : ७,७९० जणांनी प्रतिसाद दिला. पैकी ५३.३ टक्के लोकांना स्वच्छता आणि आरोग्य, रस्ते आणि पथदिवे, पाणीपुरवठा यापैकी कोणतेही काम झाले नाही असे वाटते. १९.३ % लोकांनी सांगता येणार नाही असे उत्तर नोंदवले. १०.९ % लोकांची रस्ते आणि पथदिवे आणि ८.२ % लोकांची पाणीपुरवठा व तेवढ्याच लोकांची स्वच्छता आणि आरोग्याबाबत तक्रार आहे.
६. विद्यमानपैकी पुन्हा कोण येईल?
७८९० जणांनी या प्रश्नावर मत नोंदवले आहे. त्यातील ३६ टक्के लोकांना दोनपैकी एकही विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडून येणार नाही असे वाटते. तर ३१.१ टक्के लोकांना दोन्हीपैकी एकच नगरसेवक पुन्हा निवडून येईल असे वाटते आहे. १६.३ टक्के लोकं मात्र दोन्ही नगरसेवक पुन्हा निवडून येतील असे सांगताहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.