आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्री संप्रदायातर्फे बुधवारी (दि. १) भुसावळ विभागात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. भुसावळ शहरात ५५४ श्री. सदस्यांनी तब्बल १०.६४ टन कचरा संकलीत केला. तहसील कार्यालय, पंचायत समितीसह १३ शासकीय कार्यालयांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पद्मश्री विभूषित महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात, भुसावळात ५५४ श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
२०२३ हे वर्ष महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षभरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांची आखणी भुसावळ विभागात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व शासकीय कार्यालये व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शासकीय कार्यालयांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर एकाचवेळी ५५४ श्री सदस्यांनी स्वच्छता करुन १०.६४ टन कचरा संकलित केला. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत कचरा आणला. माजी नगरसेवक निर्मल कोठारी, दुर्गेश ठाकूर यांनी भेट दिली.
या ठिकाणी स्वच्छता
तहसील, पंचायत समिती, पोलिस ठाणे, भूमापन विभाग, न्यायालय, प्रांत कार्यालय, डीवाएसपी कार्यालय, पालिका, विश्रामगृह, बसस्थानक, पालिका रुग्णालय, बाजार समिती व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय, रेल्वे स्थानक ते नाहाटा चौफुली, लोखंडी पूल ते गांधी चौक, गांधी पुतळा ते कंडारी रोड, गांधी पुतळा ते मोरेश्वर नगर, डॉ. मुखर्जी उद्यान, यावलरोड येथे स्वच्छता केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.