आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य चांगले‎ राखण्यासाठी योगाची आवश्यकता:योग प्रशिक्षण शिबिरात‎ 56 विद्यार्थिनींचा सहभाग‎

ऐनपूर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐनपूर (ता.रावेर) येथील सरदार‎ वल्लभभाई पटेल कला व विज्ञान‎ महाविद्यालयात युवती सभेने‎ विद्यार्थिनींसाठी सात दिवसीय योगा‎ शिबिराचे आयोजन केले आहे.‎ प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी‎ उद््घाटन केले.‎ यावेळी संवाद साधताना अंजने‎ यांनी, वर्तमान काळात सर्व‎ वयोगटाला आरोग्य चांगले‎ राखण्यासाठी योगाची आवश्यकता‎ आहे. मात्र, त्यात सातत्य गरजेचे‎ आहे असा सल्ला दिला.

युवती‎ सभा सचिव डॉ.नीता वाणी यांनी‎ शिबिराचा उद्देश कथन केला.‎ विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह‎ मार्गदर्शन योगा शिक्षिका स्वाती‎ जोशी या करत आहेत. त्यांनी प्रथम‎ योगाचे प्रकार, योगाचे महत्व,‎ वेगवेगळ्या आजारासाठी कोणता‎ योगा करावा याबाबत माहिती दिली.‎ शिक्षिका कोमल पाटील सहकार्य‎ करत आहेत. शिबिरासाठी डॉ.नीता‎ वाणी यांना डॉ.रेखा पाटील,‎ डॉ.व्ही.एन.रामटेके, जयेश बढे,‎ श्रेयस पाटील यांचे सहकार्य मिळत‎ आहे. शिबिरात ५६ विद्यार्थिनी‎ सहभागी झाल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...