आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांची वाढ:रब्बीसाठी हवीत 5,925 टन रासायनिक खते ; युरियाची सर्वाधिक 2250 टन विक्री होणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यातील रब्बी हंगामासाठी यंदा ५,९२५ टन रासायनिक खतांची मागणी पं.स.च्या कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यात सर्वाधिक युरियाचा २२५० टन वापर होईल. पिकांची योग्य वाढ होण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. त्यामुळे खरिपाप्रमाणे रब्बीत देखील सर्वाधिक मागणी युरियाची आहे. यंदाच्या रब्बीसाठी २२५० टन युरिया, २७५ टन डीएपी, ७२५ टन एमओपी, १ हजार टन एसएसपी, ७५ टन अमोनियम सल्फेटचा वापर होईल. सोबतच १०:२६:२६, १५:१५:१५, १९:१९:१९, २०:२०:०० व अन्य मिश्रखतांचा वापर होईल. मात्र, शेतकऱ्यांकडून मिश्र खतांऐवजी सरळ म्हणजेच युरिया, पोटॅश व फॉस्फेटला अधिक मागणी असते. दरम्यान, गेल्या खरीप हंगामात भुसावळ तालुक्यात ७,६५० टन रासायनिक खतांचा वापर झाला. यात सर्वाधिक २९२५ टन युरिया, १३५० टन सिंगल सुपर फास्फेट, १,०३५ टन म्युरेट ऑफ पोटेश, ३३८ टन डीएपी वापरले गेले. रब्बीचे क्षेत्र खरिपापेक्षा कमी असल्याने खतांचा वापर घटतो.

टंचाई भासणार नाही
रब्बी हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा नाही. तालुक्यात सर्व प्रकारची सरळ व मिश्र खते उपलब्ध आहेत. आम्ही केलेल्या मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा देखील होत आहे. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास तालुका व पंचायत समिती कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
धीरज बढे, कृषी अधिकारी, पं.स.

बातम्या आणखी आहेत...