आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ मार्च रोजी लेडीज रनचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक महिलांनी यात नावनोंदणी केली असून, कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सहभागी स्पर्धकांसाठी आयोजकांतर्फे दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सराव सत्राचे आयोजन केले जाते. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
इतक्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र धावत आहेत व आरोग्यासाठी जनजागृती करत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. १२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आयोजकांना पोलिस विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील. तसेच महिलांसाठी हा रन एक सन्मान रन राहील अशी माहिती त्यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याची एक बाजू धावपटूंसाठी मोकळी ठेऊ असे देखील त्यांनी सांगितले. सर्व सत्रामध्ये वॉर्मअप नंतर रनिंगचा सर्व घेण्यात आला. नंतर स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेतले जातात. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनीही पुरुष धावपटूंसोबत स्ट्रेचिंग केली. रनर्स असोसिएशनतर्फे प्रवीण फालक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, प्रवीण वारके, स्वाती फालक, पूनम भंगाळे, पूनम कुलकर्णी, प्रवीण पाटील व १२५पेक्षा अधिक महिला स्पर्धक उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.