आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुग:मुगाला 6,652 रुपये क्विंटल भाव; खरीप हंगामातील मुगाची खरेदी

भुसावळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ बाजार समितीमध्ये मंगळवारपासून खरीप हंगामातील मुगाची खरेदी सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी दुसखेडा (ता.यावल) येथील संतोष सोनवणे या शेतकऱ्याचा सुमारे अडीच क्विंटल मूग व्यापारी रामेश्वर हेडा यांनी ६,६५२ रुपये क्विंटल दराने खरेदी केला. मुगाच्या प्रतवारी नुसार समाधानकारक दर मिळाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची आवक सुरू झाली आहे. ही आवक सुरू होताच शासनाकडून हमी भावात मूग खरेदी केंद्र सुरु केले जाते. तूर्त भुसावळ तालुक्यात असे केंद्र सुरू झालेले नाही. मात्र, बाजार समितीमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून मूग खरेदी केला जात आहे. मंगळवारपासून ही खरेदी सुरू झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी संतोष सोनवणे यांच्या मुगाला ६ हजार ६५२ रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीचे सचिव नितीन पाटील, हमाल मापाडी अध्यक्ष कैलास गव्हाणे, व्यापारी रामेश्वर हेडा उपस्थित होते. मुगाची आवक वाढेल असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...