आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा‎:यावलला 67 विद्यार्थ्यांची पेपरला दांडी‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील इयत्ता दहावीच्या पहिल्या‎ मराठीच्या पेपरला ६७ विद्यार्थ्यांनी दांडी‎ मारली. तर १० परीक्षा केंद्रावर ३ हजार‎ ३१३ विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. सर्व‎ परिक्षा केंद्रावर बैठे पथक लक्ष ठेवून‎ होते. तहसीलदार, गटविकास अधिकारी‎ व पोलिसांच्या पथकाने गस्त केली.‎ तालुक्यातील सर्व १० परिक्षा केंद्रांवर‎ सकाळी १० वाजेपासून विद्यार्थ्यांना‎ प्रवेश दिला जात होता. मराठी माध्यम व‎ उर्दू माध्यमाच्या ६७ विद्यार्थ्यांनी दांडी‎ मारली होती. यावल तालुक्यात यावल व‎ फैजपूर शहरासह ग्रामीण भागात दहा‎ परीक्षा केंद्र आहेत.

या सर्व परीक्षा‎ केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला‎ होता. तसेच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी‎ म्हणून बैठे पथक नियुक्त होते.‎ गस्तीपथकात तहसीलदार महेश पवार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री‎ गायकवाड, पोलिस निरीक्षक राकेश‎ मानगावकर, फैजपूरचे सहायक पोलिस‎ निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी‎ विविध केंद्रावर भेट दिली. यावल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कस्टडी प्रमुख म्हणून‎ गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, तर‎ फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणुन शिक्षण‎ विस्तार अधिकारी विलास कोळी‎ कामकाज पाहत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...