आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:पंधरवड्यात आढळले गोवरचे 7 बाल रुग्ण; भुसावळचा मुंबईशी संपर्क असल्याने सतर्कता

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर आता राज्यभरात गोवर आजार फैलावत आहे. रेल्वेच्या जंक्शन स्थानकामुळे मुंबईतून येणाऱ्यांचा शहरासोबत थेट संपर्क असल्याने शहरातही गोवरची साथ वाढण्याचा धोका आहे. गेल्या पंधरवड्यात शहरात गोवरची लक्षणे असणारी सात बालके आढळली. यातील तीन बालकांच्या रक्तातील सिरमचे नमुने पुणे येथील व्हायरालॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले.

कोरोना महामारीवर शहराने नियंत्रण मिळवले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई व उपनगरांमध्ये बालकांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. भुसावळ शहराचा रेल्वेमुळे मुंबईसोबत थेट संपर्क असतो. यामुळे साथरोगाचा शहरात फैलाव होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या सुचनांनुसार पालिका आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली आहे.शहरातील बालरोग तज्ज्ञांनाही याबाबत माहिती कळवण्याची सूचना दिली आहे.

लसीकरणावर भर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात दरमहा बालकांसाठी ९४ सत्रांचे आयोजन होते. या लसीकरणातून बीसीजी, पोलिओ, व्हिटामिन ए, पेंन्टावायरस, रोटावायरसचे लसीकरण केले जाते. पालिका हद्दीबाहेर विटभट्ट्या, वस्त्यांमध्येही लसीकरण होते.

काळजी घ्या, उद्रेक नाही शहरात गोवरचा उद्रेक नाही. १९७० पूर्वी जन्म झालेल्या व लहानपणी गोवरची एमआर लस न घेतलेल्या वृद्धांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे लक्षणे दिसताच उपचार करुन घ्यावे. वेळीच उपचार घेतला तर गोवर आजार गंभीर नाही. - डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, पालिका रुग्णालय

तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लक्षणे काय ? : गोवर हा साथीचा आजार आहे, जो पॅरामिक्सोव्हायरसमुळे पसरतो. विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात आणि साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात गोवरची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी-ताप, खोकला, घसा व अंग दुखणे, डोळे लाल होणे, शरीरावर लालसर पुरळ. उपचार पद्धती : गोवरची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्त तपासणी करून निदान झाल्यावर लगेच उपचार सुरू करा. घरगुती उपचारांवर विश्वास न ठेवता वेळीच वैद्यकीय उपचार झाले तर रोगाची तीव्रता कमी होते. उपचाराला अधिक प्रमाणात विलंब झाला तर पुढे त्यातून न्यूमोनिया होऊ शकतो. रुग्णाची प्रकृती खालावते. धोका कोणाला? : गोवरचा सर्वांत जास्त धोका लसीकरण न झालेल्या लहान मुलांना, गरोदर महिलांना गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय लसीकरण न झालेली वयाच्या ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिकांनाही गोवर होऊ शकतो. लहानपणी दोन्ही डोस घेतल्यास गोवरपासून आयुष्यभर संरक्षण मिळते. आहार कसा घ्यावा : ज्या बालकांमध्ये ‘व्हीटामिन ए’ची कमतरता असते. त्यांच्यात गोवरची लक्षणे जास्त तीव्रतेने दिसतात. शरीरातले द्रव पदार्थ कमी होतात, ज्यामुळे व्हिटामीन ए ची पातळी घसरते. यामुळे बालकांना व ज्येष्ठांनी संपूर्ण अन्नद्रव्ये मिळतील, अशा सकस आहाराचे सेवन करावे. पौष्टीक आहार घ्यावा.

बातम्या आणखी आहेत...