आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:70 जनमित्रांनी घेतला‎ आरोग्य शिबिराचा लाभ‎

मुक्ताईनगर‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी‎ अभियंता ब्रजेश गुप्ता यांच्या‎ अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात‎ लाइनमन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात‎ आला. तसेच लाइनमसाठी आरोग्य शिबिर‎ घेण्यात आले. त्यात ७० कर्मचाऱ्यांची‎ आरोग्य तपासणी करण्यात आली.‎ विभागातील जनमित्रांची उपस्थिती‎ कार्यक्रमाला लाभली. सर्व जनमित्रांना‎ प्रकाशदूत म्हणून गौरवण्यात आले.

एकूण‎ ४९ कर्मचाऱ्यांना तांत्रिक/महसूल कामात‎ विशेष योगदानाबाबत प्रमाणित करण्यात‎ आले. मुक्ताईनगर विभागाचे अतिरिक्त‎ कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी‎ सर्व कर्मचारी, अधिकारी यांना‎ सुरक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व‎ अधिकारी, कर्मचारी, जनमित्र,‎ अभियंत्यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली.‎ मुक्ताईनगर उपविभागाचे उपकार्यकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभियंता ज्ञानेश्वर ढोले, वरणगावचे तुषार‎ गजरे व बोदवडचे सचिन मुंढे उपस्थित‎ होते. मुक्ताईनगर विभागातील सर्व‎ अभियंते, कर्मचारी, अधिकारी उपस्थित‎ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वराडे यांनी‎ केले तर आभार प्रदर्शन गणगणे यांनी केले.‎ शिबिराला प्रतिसाद लाभला.‎

बातम्या आणखी आहेत...