आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान एनआय आणि नॉन एनआय आणि डबल लाईन यार्ड रिमॉडेलिंगची कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यासाठी प्रशासनाने ३ ते २४ जानेवारी काळात ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेस सलग तीन दिवस व इतही ८ गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे आधीच आरक्षण केले आहे, त्यांना तिकिटाचा परतावा मिळेल. आॅनलाईन तिकीटे काढले असल्यास बँक खात्यात रक्कम वर्ग होईल. तर खिडकीवरून तिकीट काढले आहे त्यांना तिकीट खिडकीवरूनच परतावा मिळेल.
रद्द असलेल्या गाड्या २२१४७ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ६ ते १३ व २० जानेवारी, २२१४८ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस ७ ते १४ जानेवारी व २१ जानेवारी, १२१३१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस २३ जानेवारी, १२१३२ साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस २४ जानेवारी, ०११३५ भुसावळ-दौंड मेमू गाडी ५ ते १२ जानेवारी व १९ जानेवारी, ०१३३६ दौंड-भुसावळ मेमू गाडी ५ ते १२ व १९ जानेवारी, ११०३९ कोल्हापूर -गाेंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१,२२,२३ जानेवारीला रद्द असेल. याच तारखेला गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही धावणार नाही. यामुळे विभागातील प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.