आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॉक:ब्लाॅकमुळे आज 8 रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभागात भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम होणार आहे. त्यासाठी ५ आणि ६ डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान अप-डाउन मार्गावरील तब्बल ३८ गाड्या रद्द, तर १८ गाड्यांचे मार्गात बदलण्यात आले. यामुळे मंगळवारी (दि.६) देखील ८ गाड्या रद्द असतील.

ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ३४ गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. यामुळे रविवारी देखील हाल झाले. नागपूर-पुणे, पुणे-नागपूर, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम, मुंबई-नागपूर सेवाग्राम, भुसावळ-इगतपुरी मेमू, इगतपुरी-भुसावळ मेमू, रेवा-राजकोट एक्स्प्रेस, नंदुरबार-भुसावळ, भुसावळ-नंदुरबार, अमरावती-सुरत, अहमदाबाद-नागपूर, भुसावळ-देवळाली शटल, देवळाली-भुसावळ शटल, महाराष्ट्र एक्स्प्रेस (अप-डाऊन दोन्ही), सुरत-भुसावळ, भुसावळ-सुरत, पुणे-जबलपूर, अमरावती-मुंबई, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी पॅसेंजर रद्द केली होती.

आज या गाड्या रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय
६ डिसेंबरला पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे हुतात्मा, भुसावळ-देवळाली शटल, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-सुरत, भुसावळ-कटनी पॅसेंजर, बांद्रा-भुसावळ, भुसावळ-बांद्रा एक्स्प्रेस या गाड्या धावणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...