आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशिष्ट चवीमुळे पसंती:बामणोदच्या वांग्यांना 80 रुपये दर

भुसावळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल तालुक्यातील बामणोदच्या प्रसिद्ध वांग्यांची गेल्या चार दिवसांपासून आवक सुरू झाली आहे. थंडी वाढल्याने उत्पादनही वाढते आहे. बामणोदच्या या वांग्यांना सध्या ८० रुपये किलो, तर अन्य भागातून विक्रीसाठी येणाऱ्या वांग्यांना ३० ते ४० रुपये किलोचे दर मिळत आहेत.

बामणोद येथील प्रसिद्ध भरताच्या वांगांची गेल्या चार दिवसांपासून बाजारात आवक सुरु झाली. सध्या हे प्रमाण कमी आहे. सहा हजार रोपांतून आठवड्यातून केवळ १५ किलो वांग्यांची काढणी होत आहे. अल्प प्रमाणातील उत्पादनामुळे वांग्यांना तब्बल ८० रुपये किलोचे दर मिळत आहेत.

वाढती थंडी फायदेशीर
गेल्या आठवड्यापासून थंडी वाढल्याने बामणोदला भरताच्या वांग्यांची काढणी सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात उत्पादन वाढेल. सध्या ८० रुपये किलो दर आहेत. सध्या बाजारात बामणोदच्या नावाने इतर वांग्यांची विक्री होत आहे. प्रमोद फेगडे, शेतकरी, बामणोद

बातम्या आणखी आहेत...