आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणी यशस्वी:भुसावळ-पाचाेरा तिसऱ्या लाइनवर ताशी ९० वेग

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-पाचाेरा दरम्यान टाकलेल्या तिसऱ्या रेल्वे लाइनची मुख्य संरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस पाहणी केली. यानंतर शुक्रवारी १२० किमी वेगाने विशेष गाडी चालवून घेतलेली चाचणी यशस्वी झाली. आता किरकोळ त्रूटी दूर करून साधारणपणे महिनाभराने या मार्गावरून डिझेल इंजिन लावलेल्या मालगाड्या ताशी ९० च्या वेगाने धावण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे जळगाव-पाचोरा सेक्शन मधील इतर दोन मार्गांवर प्रवासी गाड्या उशिराने धावण्याचे प्रमाण कमी होईल.

संरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी भुसावळ जंक्शनपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या निरीक्षणाला सुरुवात केली. जळगावपासून अधिकारी हे सहा माेटरट्राॅलीने प्रत्यक्ष रेल्वे रूळ व पुलांची पाहणी करत पुढे गेले. शुक्रवारी अंतीम पाहणी करून कामांतील काही त्रुटी दूर करण्याची सूचना केली. यानंतर शुक्रवारी पाचोरा ते जळगाव दरम्यान सात डब्यांची विशेष गाडी डिझेल इंजिन लावून ताशी १२० च्या वेगात चालवण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. दरम्यान, पाचाेरा ते जळगाव विशेष गाडीने विंडाे निरीक्षण करताना (गाडीच्या शेवटच्या डब्यातील काचेतून पाहणी) गाडी जेव्हा ताशी १२०च्या वेगावर पाेहोचली तेव्हा निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आता पुढील टप्प्यात जळगाव ते पाचोरा ही तिसरी लाइन महिनाभरातच मालगाड्यांसाठी उपलब्ध होईल.

तिसऱ्या रेल्वे लाइनचा असा हाेणार फायदा
जळगाव-पाचाेरा तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे या मार्गावरून मालगाड्या चालवण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, त्यासाठी ९०ची वेगमर्यादा असेल. यामुळे भुसावळ येथून मुंबईकडे जाणारी मालगाडी पाचाेरापर्यंत तिसऱ्या मार्गावरून धावेल. परिणामी मुख्य लाइनवरून धावणाऱ्या प्रवासी गाड्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसणार नाही. सेक्शनमध्ये त्या वेळेवर धावतील.

बातम्या आणखी आहेत...