आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील कार्यालय:सहा ग्रा.पं.साठी शेवटच्या दिवशी 93 अर्ज दाखल ; सरपंचपदासाठी 15, सदस्यांसाठी आले 78 अर्ज

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवस होता. अखेरच्या दिवशी ९३ अर्ज दाखल झाले. त्यामुळे तहसील कार्यालयातील गोदामाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होतं. ग्रामीण भागातील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १५ व सदस्य पदासाठी ७८ असे एकूण ९३ अर्ज दाखल झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या लोकनियुक्त सरपंचपद व सदस्य पदांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलीच गर्दी झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिल्यामुळे, शेवटच्या दिवशी झुंबड उडाली. इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक यांनी शासकीय गोदामात या ठिकाणी खाली बसून आपल्या अर्जातील त्रुटी दूर करत अर्ज दाखल केले. यात सरपंच पदासाठी कन्हाळे खुर्द ३,ओझरखेडा २, कन्हाळे बुद्रूक ३, तळवेल ३, मोंढाळा १, पिंपळगाव खुर्द ३, सदस्य पदासाठी कन्हाळे खुर्द ६, ओझरखेडा २०, कन्हाळे बुद्रूक १४, तळवेल २०, मोंढाळा ५, पिंपळगाव खुर्द १३ अर्ज दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...