आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लस:पहिल्याच दिवशी 97 बालकांना लस

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोवरचे संक्रमण रोखण्यासाठी आराेग्य विभागाने १५ ते २६ डिसेंबर या काळात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटाच्या बालकांचे सर्वेक्षण व लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात गुरूवारी पहिल्याच दिवशी १०० लसीकरणाचे उद्दिष्ट होते. पैकी ९७ बालकांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात ही मोहीम २६ डिसेंबरपर्यंत चालेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी गोवरबाबत टास्क फोर्सची बैठक घेत २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना आराेग्य विभागाला केली आहे. त्यानुसार भुसावळ मोहीम सुरू झाली. १४ पथकांनी शहरातील विविध भागात सर्वेक्षण केले. ९७ बालकांना लस दिली. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण व लसीकरण १५ ते २६ डिसेंबरपर्यंत चालेल अशी माहिती डाॅ.कीर्ती फलटणकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...