आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:भुसावळात भाजपच्या विकास तीर्थ बाइक रॅलीत 97 वाहनांचा समावेश

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात नरेंद्र मोदींच्या सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातही भाजप युवा मोर्चातर्फे गुरुवारी सायंकाळी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत ९७ मोटारसायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. यावेळी विकास तीर्थ बाइक रॅली रथही सहभागी झाला.

शहरातील नाहाटा चौफुलीपासून गुरुवारी सायंकाळी मोटारसायकल रॅलीला सुरूवात झाली. आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली ही बाइक रॅली काढण्यात आली. नाहाटा चौफुलीपासून सुरू होऊन जामनेर रोडने अष्टभुजा देवी, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलिस ठाणे, हंबर्डीकर चौक, गांधी पुतळा, तहसील कार्यालयावरून जळगाव रोडने लोणारी हॉलजवळ या रॅलीचा समारोप झाला. भाजप तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, परिक्षित बऱ्हाटे, युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजेंद्र नाटकर, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष जितेंद्र कोळी, सुनील महाजन, शैलजा पाटील, अनिता आंबेकर, चंद्रशेखर अग्रवाल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...